`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!Press Conference of AAP in Akola in expensive ho

`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!

`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!
www.24taas.com, झी मीडिया, अकोला

आम आदमी पक्षाचा अकोला जिल्ह्यात पहिलाच जाहीर कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासंदर्भात आयोजित `आप`ची पत्रकार परिषद शहरातील एका महागड्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं `आम आदमी पक्षा`च्या `खास` पणाची अकोल्यात चांगलीच चर्चा होतेय.

या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणूक काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या काही वक्तव्यांनी निश्चितपणे फटका बसल्याची कबुली `आम आदमी पक्षा`च्या नेत्या अंजली दमानिया यांनी दिलीय.

कदाचित अण्णांच्या वक्तव्यांमुळं दिल्लीतील बहुमत हुकलं असेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 20:00


comments powered by Disqus