Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:12
www.24taas.com, झी मीडिया, वर्धाजळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
बस मधील एसी चेंबरला आग लागल्यानं ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अपघातात १५ प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय. जखमींना कारंजा, आर्वी आणि नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय.
ही बस जळगावहून नागपूरला जात असता प्रवासा दरम्यानच पेट घेतला. काही कळण्याच्याआत बसला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच काही प्रवाशांनी पळ काढला. पण काही जण यातून वाचू शकले नाहीत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 29, 2014, 11:47