महिला, मुली विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश Racket selling ladies arrested

महिला, मुली विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

महिला, मुली विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
www.24taas.com, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्या-या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. वरो-यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.

वरोरा शहरातली पंचफुला नक्षिणे ही महिला युपीतल्या मथुरेत या महिलांना विकायची. याप्रकरणी तिघांना अटक केलीय. तर दोनजण फरार आहेत. घरगुती वादानं त्रस्त महिला आणि मुलींना लक्ष्य करून पंचफुला त्यांना उत्तर प्रदेशात न्यायची आणि ५० ते ५५ हजारांत एका जोडप्याला विकायची. वरो-यातल्या एका महिलेलाही तीनं असंच मथुरेत एका जोडप्याला विकलं.



त्या महिलेला या जोडप्याचा संशय आला. त्यानंतर तिनं या जोडप्याला पोलिसांची धमकी दिली. पतीचा जाच ही महिला पंचफुलाला नेहमी सांगायची. हिच संधी पंचफुलानं साधली आणि या महिलेची विक्री केली

First Published: Sunday, March 3, 2013, 23:30


comments powered by Disqus