राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटकाRahul Dravid`s Mother in law`s Mangalsutra Sto

राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटका

राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यात चेन स्नॅच‌िंगच्या घटना खूप मोठ्या संख्येनं घडतांना दिसतायेत. नागपूरातही सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढलाय. या चोरांचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर सेलिब्रेटींच्या नातेवाईकांनाही बसतोय. द वॉल राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही हा फटका बसलाय.

मंगळवारी सकाळी पावणे बारा वाजता आपल्या कामानं व्हीएनआयटी परिसरात असलेल्या एसबीआय बँकेत राहुल द्रविडच्या सासू आणि ज्येष्ठ आहारतृज्ज्ञ जयश्री पेंढरकर आल्या होत्या. आपलं काम आटोपून त्या कारकडे निघाल्या असता, विरूद्ध दिशेनं येणाऱ्या दोन मोटारसायकल स्वारांनी त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचलं.

25 हजार रुपये किमतीचं हे मंगळसूत्र होतं. या प्रकरणी पेंढरकर यांनी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यापूर्वी अशीच घटना भोपाळमध्येही घडली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आईचं मंगळसूत्रही चोरट्यांनी लंपास केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014, 13:46


comments powered by Disqus