Last Updated: Tuesday, April 16, 2013, 23:01
www.24taas.com, नागपूरताडोबामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे.
राज ठाकरे नागपूरला पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हा पुरस्कार दिला. वाघ वाचवण्यासाठी जे कुणी शिका-यांना पकडून देतील, त्यांना पाच लाख देण्यात येतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती.
१२ पोलीस अधिकारी तसंच एक कर्मचारी आणि १ खबरी अशा १३ जणांना हा पुरस्कार देण्यात आला.
First Published: Tuesday, April 16, 2013, 23:01