Last Updated: Thursday, January 9, 2014, 13:52
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरमनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सातत्यानं कुठल्या एका प्रदेशाबद्दल बोलत नाहीत तर ते देशाबद्दल, देशाच्या विकासाबाबत बोलतात.
मोदींच्या प्रसिद्धीवरून कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानपदाच्या उमेदवारपदी नियुक्ती झाल्यानंतर मोदींनी गुजरात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असं राज ठाकरे म्हणाले.
त्यावरच आता भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. देशभरात नरेंद्र मोदींची लाट आहे, त्यामुळं राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे. मोदींची लोकप्रियता इतकी आहे की त्यांच्यावर टीका करणं किंवा काहीतरी बोलणं हे सर्वांनाच भाग पडतंय, अशी प्रतिक्रिया भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी दिलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 9, 2014, 13:52