बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी अपरिपक्व- संजय निरुपम Sanjay Nirupam about Balasaheb Thackeray Memorial

बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी अपरिपक्व- संजय निरुपम

बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी अपरिपक्व- संजय निरुपम
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याची मागणी अपरिपक्व असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे. संजय निरुपम हे नागपूरमध्ये असं म्हणाले.

बाळासाहेब सर्व सामान्य जनतेच्या मनामनात बसले असताना स्मारकाबद्दल या प्रकारे मागणी करणं म्हणजे बाळासाहेबांची उंची कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे संजय निरुपम म्हणाले. संजय निरुपम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच शिवसेना सोडली होती. संजय निरुपम आता काँग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार आहे.

आयपीएल भ्रष्टाचार आणि सट्टेबाजीचा अड्डा झाल्याचा आरोप लावत बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांनी त्वरित राजीनामा देण्याची निरुपम यांनी आज नागपुरात केली. या घोटाळ्याचा तपास होताना यात मोठे मासे सुटता कामा नये याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. दुर्दैवाने देशातल सर्वच राजकीय पक्षांचे नेते बीसीसीआय सदस्य असल्याने कुठलीच ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 27, 2013, 20:42


comments powered by Disqus