ठाकरे कुटुंब उत्तर भारतातलंच- निरुपम Sanjay Nirupan on Thackeray

ठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम

ठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम
www.24taas.com, नागपूर

नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्तव्य खासदार संजय निरुपम यांनी केलंय.

नागपूरला भरलेल्या उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांच्या वादाला तोंड फोडलं आहे. या मेळाव्यात बोलताना संजय निरुपम यांनी ठाकरे कुटुंबाच्या मूळावर हल्ला चढवत ठाकरे कुटुंबीय हे उत्तर भारतातलेच असल्याचा दावा केला आहे.

तसंच महाराष्ट्रात वाढणारी गुन्हेगारी ही उत्तर प्रदेश, बिहार येथील लोकांमुळे वाढली असल्याच्या राज ठाकरेंच्या दाव्यालाही संजय निरुपम यांनी आव्हान दिलं. जर महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीला उत्तर भारतीय जबाबदार असतील; तर अरुण गवळी, दाऊद इब्राहिम यांसारखे गुन्हेगार कुठले आहेत? असा खडा सवाल त्यांनी ठाकरेंना केला आहे. आता यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे तसंच बाळासाहेब ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, ते लवकरच कळेल.

First Published: Sunday, October 7, 2012, 23:31


comments powered by Disqus