Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:11
www.24taas.com, नागपूरभाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती समुहा तर्फे नागपुरात सुरु असलेल्या एग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनाला आज केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट दिली. दोन दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांनी रेशीमबागेत सुरु असलेल्या प्रदर्शनात सुमारे ४० मिनिटे घालवली.
सौर उर्जेवर चालणाऱ्या ऑटोरिक्षात गडकरी सोबत काही वेळ फिरल्यानंतर त्यांनी प्रदर्शनातल्या विविध स्टॉलला भेट दिली. या सारख्या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता बघता असे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात आयोजित करण्या संबंधी आपण विचार करत असल्याचं पवार म्हणाले.
१० दिवसा पूर्वी राज्याचे उद्योग मंत्री नारायण राणे हे देखील नागपूरला आले असता त्यांनी गडकरींची त्यांच्या घरी भेट घेतली होती. १० दिवसांत दोन मोठ्या पक्षांच्या दोन मोठ्या नेत्यांच्या गडकरी भेटीमुळे राजकीय क्षेत्रात विविध चर्चा सुरू झाल्यात.
First Published: Sunday, January 27, 2013, 00:36