`विनाअर्ज घरी गेला... आता उपाशीच राहा`, student without food in hostel

`विनाअर्ज घरी गेला... आता उपाशीच राहा`

`विनाअर्ज घरी गेला... आता उपाशीच राहा`
www.24taas.com, वर्धा
अर्ज न करता घर गेला म्हणून एका विद्यार्थ्याला उपाशी ठेवण्यात आलं, ही घटना आहे वर्ध्याच्या हिंगणघाटमधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहातली...

शुभम मेश्राम नावाचा विद्यार्थी प्रकृती ठीक नसल्यानं गावी घरी गेला होता. मात्र, जाण्याआधी त्यानं सुटीचा अर्ज दिला नाही म्हणून त्याचं जेवण बंद करण्यात यावं, असं तुघलकी फर्मान वसतिगृह अधिक्षकांनी बजावलं. या आदेशामुळं शुभम गेल्या दिवसांपासून उपाशी आहे. सुट्टीचा अर्ज दिला नसल्यानं शुभमला जेवण देण्यास मनाई करण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय. अधिक्षकांच्या हुकूमापुढे काही चालत नसल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याची शुभमला मदत करण्याची हिंमत झाली नाही.

असा आदेश देणाऱ्या वसतिगृह अधीक्षकावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलीय. वसतिगृहात अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय

First Published: Thursday, October 11, 2012, 10:59


comments powered by Disqus