Last Updated: Sunday, April 21, 2013, 14:09
www.24taas.com,चंद्रपूरताडोबाच्या जंगलाशेजारी नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी तैनात असलेल्या शार्प शूटर्सच्या सहा टीम्सला बिबट्याने चकवा देत पुन्हा हल्ला चढवलाय.
वायगाव इथं बिबट्यानं पहाटे केलेल्या हल्ल्यात ५० वर्षीय यादव लाटेलवार गंभीर जखमी झालाय. चांदापूरचा राहणारा यादव लाटेलवार आपल्या एका नातेवाईकाकडे वायगावला आला होता. पहाटेच्या सुमारास गावावळच बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात त्याच्या मानेवर, पाठीवर आणि चेह-यावर गंभीर जखमा झाल्यात. त्याच्यावर चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचा सरकारने आदेश दिल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून शार्प शूटर्सच्या ६ टीम्स ताडोबाच्या जंगलात गस्त घालताहेत.
मात्र या नंतरही नरक्षक्षक बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमवावा लागलाय तर ३ जण गंभीर जखमी झालेत. या घटनेनंतर परिसरात पुन्हा एकदा भितीचं वातावरण पसरलंय.
First Published: Sunday, April 21, 2013, 14:07