चंद्रपूर मनपाचा कहर, पाळीव कुत्र्यांवरही लादला कर Tax on Pet doggies in Chandrapur

चंद्रपूर महापालिकेचा कहर, पाळीव कुत्र्यांवरही लादला कर

चंद्रपूर महापालिकेचा कहर, पाळीव कुत्र्यांवरही लादला कर
www.24taas.com, चंद्रपूर

चंद्रपूर महापालिकेचं पहिलं नव्यानेच अस्तित्वात आलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प काल स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. २७८ कोटींच्या या बजेटमध्ये पालिकेच्या उत्पन वाढीसाठी अनेक प्रकारचे नवीन कर नागरिकांवर लावण्यात आले आहेत. मात्र पाळीव कुत्र्यांवर वर्षाकाठी ५०० रुपयांचा कर लावून महानगरपालिकेने लोकांना आश्चर्याचा जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समितीच्या या निर्णयावर सामान्य नागरिकांसह विरोधकांनीही नाराजी व्यक्त व्यक्त केली आहे.

गाई, म्हशी प्रमाणे कुत्र्यापासून कुठलेही उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेचा कर लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. महानगर पालिका जर कर घेणार असेल तर त्यांनी कुत्र्याचे बाकीही खर्च उचलावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

विरोधकांनीही कुत्र्यांवरच्या या कराला विरोध दर्शविला आहे. कुत्रांवर कर लावण्यापेक्षा सत्ताधा-यांनी संपत्ति कर आणि गुंठेवारी योग्य पद्धतीने राबवून आणि शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून उत्पन्न वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त करीत या निर्णयाचा विरोध करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

कुत्र्यांच्या मुद्यावरून चंद्रपूर महापालिकेत या आधी पण मोठं नाट्य रंगलं. मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी स्थायी समितीने नवीन गाडी घेतली नाही म्हणून महापौर संगीता अमृतकर यांनी महापौरासाठी घेतलेल्या नवीन गाडीत बसण्यास नकार दिला होता. त्यामुळे या वेळी पाळीव कुत्र्यांना करमुक्त करण्यासाठी पालिकेत काय-काय नाट्य रंगतात हे लवकरच कळून येईल. मनपातील श्वानायन मागील पानावरून पुढे सुरूच आहे.

First Published: Friday, March 1, 2013, 17:36


comments powered by Disqus