Last Updated: Thursday, September 6, 2012, 12:37
www.24taas.com, गडचिरोलीशिक्षक दिनाच्या दिवशीच विद्यार्थी- शिक्षक या नात्याला काळीमा फासणारं कृत्य गडचिरोलीत समोर आलं आहे. शाळा दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
मूळचे ओदिशाचे असणारे अलबिश मोर्मू आणि हरिश्याम सोरेन (वय २८) या दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. हे शिक्षक आंध्र प्रदेश सीमेवरील सिरोंचा तालुक्यातील एका गावातील इंग्रजी शाळेत शिकवत होते.
या दोन्ही शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी आपल्याच शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. पिडित मुलीने जेव्हा घरी घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली, तेव्हा पालकांन पोलिसांकडे या शिक्षकांविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी बुधवारी या दोन्ही शिक्षकांना अटक केली आहे.
First Published: Thursday, September 6, 2012, 12:37