बाळासाहेब ठाकरेंचं मंदिर उभारणार, Temple on Balasaheb Thackeray

बाळासाहेब ठाकरेंचं मंदिर उभारणार

बाळासाहेब ठाकरेंचं मंदिर उभारणार
www.24taas.com, चंद्रपूर

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मारक होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह असलं तरी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मात्र बाळासाहेबांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय. अवघ्या देशातील शिवसैनिकांसाठी दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती चिरंतन कायम ठेवण्यासाठी भद्रावती इथं बाळासाहेबांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतलाय.

गेली १० वर्ष भद्रावती नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. भद्रावती शहराच्या सीमेवर चंद्रपूर-नागपूर महामार्गाच्या कडेला एकूण ५ एकर जागेवर १५ कोटी रू. खर्चून हे मंदिर उभारले जाणार आहे. राज्यात अन्य जागी बाळासाहेबांचे स्मारक व पुतळे उभारले जात असताना चंद्रपुरातील शिवसैनिकांनी सेना प्रमुख हेच आमचे दैवत आहे असे सांगत त्यांच्या मंदिर उभारणीचा संकल्प केला आहे.

या मंदिरात एक भव्य कलादालन, शिवसेनेच्या संघर्षाचा इतिहास, शिवसाहित्य वाचनालय, बेरोजगार सल्ला मार्गदर्शन केंद्र साकारण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.

First Published: Monday, November 26, 2012, 00:25


comments powered by Disqus