नुसत्याच बैठका आणि चर्चा... पाण्याचं काय? - Marathi News 24taas.com

नुसत्याच बैठका आणि चर्चा... पाण्याचं काय?

www.24taas.com, धुळे
 
धुळ्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडीत नागरिकांची पाण्यासाठी पायपीट आता नित्याचीच झालीय. हंडाभरपाण्यासाठी किती पायपीट करावी लागते याची गणतीच नाही. गेल्या साठ वर्षांपासूनच हे चित्र अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत आहे. मंत्री आले, अधिकारी आले, समित्या स्थापन झाल्या पण इथल्या नागरिकांना पाणी मात्र अद्यापही मिळालेलं नाही. कधी नाल्यातलं तर कधी ‘एमआयडीसी’ च्या तलावातलं पाणी मिळतं. मात्र हे पाणी गावकऱ्यांच्या वाट्याला येतं. तेही मिळेलंच याची शाश्वती मात्र देता येत नाही.
 
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे टँकरची मागणी केली. निदान टँकर तरी गावात येईल अशी आशा गावक-यांना होती. मात्र प्रशासनाचं लक्ष नसल्यानं गावकऱ्यांना कुणाकडं दाद मागावी, असा प्रश्न पडला आहे.
 
टंचाई निवारणासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका आणि उपाययोजनांच्या चर्चा सुरूच असतात. पण धनगरवाडीच्या या प्रश्नावर त्यांना अद्यापही उपाययोजना सापडलेली नसल्याचं चित्र दिसतंय. हा प्रश्न गंभीरतेनं कधी घेणार, असा प्रश्न इथले गावकरी विचारत आहेत.
 
व्हिडिओ पाहा:
 

 
 

First Published: Sunday, May 13, 2012, 18:23


comments powered by Disqus