Last Updated: Monday, May 14, 2012, 12:39
www.24taas.com, गोंदिया 
गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी हाणून पाडला आहे. जिल्ह्यातल्या दमदीटोला गावाच्या सीमेजवळ भू-सुरूंग पेरण्यात आले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं घटनास्थळावरून तब्बल १६ किलो अमोनिअम नायट्रेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दमदीटोला- थीवार रस्त्यात अमोनिअम नायट्रेट पेरण्यात आलं होतं. मात्र चिंचगड पोलिसांनी कारवाई करत साठा जप्त केला आहे. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. गेल्या एका महिन्यापासून पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू होतं.
दरम्यान विस्तारी गावाचे सरपंचं घनश्याम कोरट्टी यांचं अपहरण करून त्यांना मारून त्यांचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी गस्त अधिकच वाढवली. अश्या तऱ्हेनं भूसुरंग स्फोट घडवून एका तऱ्हेनं पोलिसांना हानी पोचवण्याचा नक्षलवाद्यांचा उद्देश होता.
First Published: Monday, May 14, 2012, 12:39