Last Updated: Friday, December 2, 2011, 11:27
झी २४ तास वेब टीम, नागपूर नागपूर गुन्हे शाखेनं बनावट फेअर अँण्ड लव्हली आणि नोवा क्रीमचा मोठा साठा जप्त केलाय. गुन्हे शाखेनं सापळा रचत 1लाख 80 हजारांचा माल जप्त केलाय. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.
फेअर अँण्ड लव्हली आणि नोवा या क्रीमचा तुम्ही जर सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर करणार असाल तर सावधान....कारण नागपूरमध्ये फेअर अँण्ड लव्हली आणि नोव्हा क्रीम संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आलीए. आपण पाहत असलेल्या ही सौंदर्य प्रसाधनं बनावट आहेत. घातक रसायनं वापरून ह्या क्रीम तयार करण्यात आल्यात. पोलिसांनी सापळा रचत फेअर अँण्ड लव्हली आणि नोव्हा क्रीमसह रेड लेबल चहा आणि झंडू बाम असा 1 लाख 80 हजाराचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय.
या क्रीममध्ये भेसळ होत असल्यामुळं त्या नागरिकांसाठी अत्यंत घातक असल्याचं मत त्वचारोग तज्ज्ञांनी व्यक्त केलं. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केलीए...तसंच शहरात किती ठिकाणी असा बनावट माल विकला जातो याचा पोलीस शोध घेत आहेत.
First Published: Friday, December 2, 2011, 11:27