Last Updated: Monday, May 21, 2012, 23:55
www.24taas.com, नागपूर 
नागपुरात दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे. नागपुरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष सिंह ठाकूर आणि सहायक पोलीस उपनरीक्षक रमेश उपाध्याय यांना दहा हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं आहे.
नागपूरच्या मेहबूबपुरा भागात राहणाऱ्या अहमद अली नावाच्या रिक्षाचालकावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या मुलालाही या प्रकरणात गोवून अटक करण्याची धमकी या दोन कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती.
अटक टाळण्यासाठी पोलिसांनी लाचेची मागणी केली होती. लाच घेताना पोलिसांना अटक तर झाली आहे मात्र त्याच बरोबर हा भ्रष्टाचार कधी संपणार?असा प्रश्न सामान्यांकडून विचारण्यात येतो आहे.
First Published: Monday, May 21, 2012, 23:55