Last Updated: Wednesday, May 23, 2012, 16:17
www.24taas.com, वर्धा वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील आरावली स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने १ मजूर ठार तर ६ मजूर गंभीर जखमी झाले. सकाळी १० च्या सुमारास हा स्फोट झाला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या कारखान्यात डेटोनेटर बनविण्यात येतात व त्यात स्फोट झाल्याने ही घटना झाली असल्याचे बोलण्यात येत आहे
वर्धा जिल्ह्यातील तळेगावमधील आरावली या बारुदाच्या कारखान्यात आज सकाळी १० च्या सुमारास ब्लास्ट झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली. या कारखान्यात डेटोनेटर व त्याचे फ्युज बनाविले जातात. आज सकाळी सगळे मजूर काम करत असताना अचानक ब्लास्ट झाल्याने कारखान्यात आग लागली. आग लागल्याने कारखान्यात खळबळ माजली.
हा ब्लास्ट इतका मोठा होता की यामुळे संपूर्ण इमारत कोसळली आणि या खाली दबून १ मजूर ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले. ब्लास्टची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर पोचले. जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या वर उपचार सुरु आहेत.या ब्लास्टचे नेमके कारण कळू ना शकल्याने शॉर्ट सर्किटने हा ब्लास्ट झाला असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. मात्र या येथे कुठलीच सुरक्षा नव्हती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे
First Published: Wednesday, May 23, 2012, 16:17