Last Updated: Friday, May 25, 2012, 08:29
आशिष आंबाडे, www.24taas.com, चंद्रपूर दागिन्यांच्या हव्यासापोटी एका सुशिक्षित घरातील तरुणीनं चोरी केल्याची घटना चंद्रपुरात घडली. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. तिच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत करण्यात आलेत.
सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापायी चंद्रपुरातल्या प्राजक्ता गुरनुले या नवविवाहितेला गजाआड व्हावं लागलंय. श्रीमंत घरात जन्मलेल्या प्राजक्ताला प्रेमविवाह केल्यानं घरातून बेदखल करण्यात आलं होतं. प्राजक्ताला सोन्याच्या दागिन्यांची हौस होती. ही हौस पुरवण्याची आर्थिक कुवत नव्हती. त्यामुळं प्राजक्तानं चोरीचा मार्ग निवडला. चंद्रपुरातल्या ‘राधास्वामी ज्वेलर्स’मध्ये ती ग्राहक म्हणून गेली. दागिने खरेदी करण्याच्या बहाण्यानं तिनं एक मंगळसूत्र लंपास केलं. प्राजक्ताची ही चोरी दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली होती.
मंगळसूत्र लंपास झाल्याचं कळताच दुकानदार आणि नोकरानं प्राजक्ताचा पाठलाग करुन तिला पकडून पोलिसांच्या हवाली केलं. अचानक आलेल्या आर्थिक अडचणीमुळं अनेकजण कसे वाममार्गाला लागतात याचं प्राजक्ता उदाहरण म्हणावं लागेल.
First Published: Friday, May 25, 2012, 08:29