Last Updated: Sunday, May 27, 2012, 16:24
www.24taas.com, नागपूर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचा ५५ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.
आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी लाल किल्ल्याचा देखावा असलेला केक तयार करण्यात आला होता. तसंच गडकरींसाठी खास पेशवे थाटातला ५५ किलो वजनाचा केकही यावेळी कापण्यात आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचं सरकार सत्तेत आणण्याचं आव्हान आपल्यासमोर असल्यांचं यावेळी गडकरींनी सांगितलं. नितीन गडकरींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी जमले होते.
First Published: Sunday, May 27, 2012, 16:24