Last Updated: Monday, May 28, 2012, 11:21
www.24taas.com, चंद्रपूर 
विधान परिषद निवडणुकीच्या सहा जागांचे निकाल लागले आहेत. चंद्रपूरची जागा काँग्रेसकडून भाजपनं खेचून आणली आहे. भाजपचे मितेश भांगडिया यांनी काँग्रेसच्या संजय पुगलियांचा पराभव केला आहे. तर उस्मानाबादमध्ये काँग्रेच्या दिलीप देशमुखांनी विजयाची हॅट्रट्रीक साधत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सुधीर कुलकर्णी यांचा पराभव केला आहे.
तर परभरणीत राष्ट्रवादीच्या बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवार ब्रिजलाल खुराणा यांच्यावर विजय मिळवला. तर अमरावतीचा गड राखण्यात भाजपला पुन्हा यश आलं आहे. प्रवीण पोटे यांनी काँग्रेसच्या बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या अनिल तटकरेंनी सलग दुसऱ्यांदा विजय नोंदवला आहे. तटकरेंनी शिवसेनेच्या उमेश शेट्येंचा पराभव केला आहे. तर नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस झाली. राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळं फेरमतमोजणी करण्यात येत आहे.
First Published: Monday, May 28, 2012, 11:21