Last Updated: Thursday, May 31, 2012, 11:02
www.24taas.com, मुंबई नागपूरमध्ये 1 ते 3 जून दरम्यान करिअर कार्निव्हलचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्निव्हलमध्ये मोठ्या संख्येनं विविध शाखांचे आणि विविध शहरांतून सहभागी होणार आहेत.
यात सुमारे 65 विविध शैक्षणिक संस्था सहभागी होणार असून शंभर पेक्षा जास्च अभ्यासक्रमांची माहिती या प्रदर्शनात मिळणारेए. या प्रदर्शनात सिंगापूरच्या शैक्षणिक संस्था देखील सहभागी होत असल्याने देश आणि विदेशातील अभ्यासक्रमांसंबंधी माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
ऍडमार्क इव्हेन्ट्स नावाच्या नागपुरातील कंपनीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून हे या प्रदर्शनाचं तेरावं वर्ष आहे. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनात प्रवेश निशुल्क असून इथं येणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला विविध अभ्यासक्रमासंबंधी माहिती देणारे मासिक देण्यात येणार आहे.
व्हिडिओ पाहा...
First Published: Thursday, May 31, 2012, 11:02