सरकारवर गुन्हा दाखल करा- मुनगंटीवार - Marathi News 24taas.com

सरकारवर गुन्हा दाखल करा- मुनगंटीवार


झी २४ तास वेब टीम, अमरावती
 
अमरावतीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांसमोर धामणगावच्या सभेत अरुण सबाणे या शेतकऱ्यानं काल आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावर मुनगंटीवारांनी काँग्रेसवर शरसंधान सोडलंय.
 
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार असून सरकारवर कलम ३०६ प्रमाणे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुनगंटीवार यांनी केलीय. भ्रष्टाचाराच्या विरोधात जो कुणी उभा राहिल त्याला भाजपा साथ देईल असंही मुनगंटीवारांनी म्हटंलय.
 
काल काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची सभा सुरु असतानाच सबाणे यांनी मुख्यमंत्र्यांना कापसाच्या प्रश्नावर बोलण्याची विनंती केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. इतकचं नाही त्यांना खाली बसायला सांगितलं. त्यामुळं भर सभेत सबाणे यांनी विष घेतलं. ही बाब लक्षात येताच त्यांना धामणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना यवतमाळला हलवण्यात आलं होतं.

First Published: Monday, December 5, 2011, 07:28


comments powered by Disqus