Last Updated: Wednesday, June 6, 2012, 14:08
www.24taas.com, नागपूर 
नागपूरात डिझेल आणि पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या महासभेत पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार कमी करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सादर केला.
त्यामुळं पेट्रोल एक रुपयानं तर डिझेल ३ रुपयानं स्वस्त होणार आहे. महापालिकेच्या प्रस्तावामुळं पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
नागपूर महापालिकेच्या या प्रस्तावानंतर इतर प्रमुख महानगरांमध्येही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात येतो का याकडं त्या तिथल्या नागरिकांचं लक्ष लागलं आहे....
First Published: Wednesday, June 6, 2012, 14:08