विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद - Marathi News 24taas.com

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

www.24taas.com, नागपूर
 
विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती. मात्र, हे पॅकेज आता बंद झालं आहे.
 
पॅकेज बंद झाल्यामुळे शेतक-यांच्या आर्थिक अडचणीत आणखीनच भर पडली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बी-बियाणं आणि खतांच्या किंमती अव्वाच्या सव्वा दरानं वाढतात. 50 टक्के अनुदानामुळे शेतक-यांसाठी तो एक दिलासा ठरत होता.
 
मात्र यंदा याबात केंद्र किंवा राज्य सरकारतर्फे अनुदानाबाबत कुठलीही सूचना न आल्याने अनुदान मिळणार नसल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलंय. तर व्यापा-यांकडून, दलालांकडून आता आणखीनच पिळवणूक होईल, असा संताप शेतक-यांनी व्यक्त केलाय.

First Published: Wednesday, June 13, 2012, 11:04


comments powered by Disqus