Last Updated: Thursday, December 8, 2011, 05:19
झी २४ तास वेब टीम, नागपूर नागपूर पोलिसांनी विद्यार्थ्यांची फसवणूक करणा-या एका जोडप्याला अटक केलीय.
शिल्पा आणि राजू पालपराती या दांपत्यानं 12 विद्यार्थ्यांची फसवणूक केली. परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून या बंटी - बबली दुकलीनं विद्यार्थ्यांची फसवणूक केली. या दांपत्यानं विद्यार्थ्यांकडून तीस लाख रूपये उकळले.
विद्यार्थ्यांना ट्रॅव्हल व्हिसावर विदेशात नेऊन त्यांना तिथंच सोडण्यात आलं होतं. हा प्रसंग आठवल्यानंर आजही विद्यार्थ्यांना धडकी भरते.
First Published: Thursday, December 8, 2011, 05:19