हेडफोन लावून गाणी ऐकाल तर 'जीव गमवाल' - Marathi News 24taas.com

हेडफोन लावून गाणी ऐकाल तर 'जीव गमवाल'

www.24taas.com, चंद्रपूर
 
मोबाईल वर गाणी ऐकणे चंद्रपूरच्या एका युवकाला चांगलेच महागात पडले. एका चुकीने त्याला जीव गमवावा लागला. चंद्रपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने जाताना एक छोटे रेल्वे स्थानक आहे विवेकानंदनगर.
 
या स्टेशनवर तैनात असलेल्या प्रकाश सारवे या रेल्वे गँगमनचा २१ वर्षीय मुलगा जगदीश दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आपल्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी रेल्वेट्रॅकवर आला होता. वडिलांना डबा देऊन जगदीश परत जात असताना त्याने आपल्या कानात मोबाईलवरील  गाणी  ऐकण्यासाठी हेडफोन लावले होते.
 
Track वर आरामात  चालत  जाणाऱ्या  जगदीशचे मागून भरधाव येणाऱ्या रेल्वेकडे लक्षच नव्हते. अचानक आलेल्या या गाडीने जगदीशला वेगात धडक देताच जगदीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
 
 
 

First Published: Monday, June 25, 2012, 23:02


comments powered by Disqus