भाजपचा राडा, तोडफोड... पोलिसांचा लाठीहल्ला - Marathi News 24taas.com

भाजपचा राडा, तोडफोड... पोलिसांचा लाठीहल्ला

 
www.24taas.com, नागपूर
 
नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. WCL कंपनीच्या कार्यालयाच्या या कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या आहेत. भाजप WCLच्या विरोधात आहे. चंद्रपुरात खाणी असलेल्या गावांमध्ये WCLनं विकासासाठी पैसे देण्याची गरज आहे.
 
मात्र पैसे देत नसल्यामुळे भाजपनं आंदोलन केलं आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यामुळे सध्या तेथील वातावरण  तणावपूर्ण आहे.
 
पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेला लाठीहल्ला आणि कार्यकर्त्यांनी केलेली तोडफोड यामुळे आता भाजप WCL कंपनी विरोधात नक्की काय धोरण अवलंबणार आहे याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
 
 
 

First Published: Tuesday, June 26, 2012, 18:43


comments powered by Disqus