राज ठाकरेंची लग्नाची 'वारी' गडकरींच्या 'गढीवरी' - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंची लग्नाची 'वारी' गडकरींच्या 'गढीवरी'

www.24taas.com, नागपूर
 
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन नागपूरच्या एंप्रेस सिटीमधील आयटी हॉलमध्ये भव्य स्वरुपात करण्यात आला. सारंग गडकरी आणि मधुरा रोडी यांचा २४ जूनला विवाह झाला होता.
 
या सोहळ्या पक्षांचे आमदार,मंत्री आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मुलाच्या रिसेप्शनला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली. तसंच सिने कलावंत अनुपम खेर आणि किरण खेर यांचीही उपस्थिती लावली.
 
त्यानिमित्त आज हा समारंभ पूर्ण दिवस चालला. साधारण ४० हजार पाहूणे या रिसेप्शला उपस्थित होते. त्यांच्या भोजनाचीही खास व्यवस्था ठेवण्यात आली होती. भोजनासाठी 5 कक्ष तयार करण्यात आले होते.
 
 

First Published: Tuesday, June 26, 2012, 22:21


comments powered by Disqus