मैत्रीचा फायदा घेऊन दोघींवर बलात्कार - Marathi News 24taas.com

मैत्रीचा फायदा घेऊन दोघींवर बलात्कार

www.24taas.com, नागपूर
नागपुरात मैत्रीचा फायदा घेत पाच नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलीए. आरोपींपैकी एकजण पीडित मुलीचा मित्र असल्यामुळे त्याला भेटण्यासाठी दोघीही गेल्या होत्या.
 
मात्र पंकज दुधकावळे नावाच्या आपल्या मित्रावर दाखवलेला अतिविश्वास त्यांना नडला. कारण पंकजसह छगन श्रीवास, प्रशांत जोगदंड, भूषण जावडे आणि संजय सोनटक्केनं दोघींवर बलात्कार केला.
 
नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर मुलींनी आपल्या पालकांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी सर्व पाच आरोपींना अटक केली.
 

 
,

First Published: Tuesday, July 3, 2012, 21:47


comments powered by Disqus