तर उपमुख्यमंत्रीपद हवे - आठवले - Marathi News 24taas.com

तर उपमुख्यमंत्रीपद हवे - आठवले

Tag:  
www.24taas.com, यवतमाळ
राज्यात महायुतीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद आणि सत्तेत 20 टक्के वाटा द्यावा अशी मागणी रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलीय. काँग्रेसबरोबर असणारी दलित मते भाजप-शिवसेनेला मिळतील असा दावा आठवलेंनी यवतमाळमध्ये केलाय.
 
रिपाईंला सोडण्यात येणा-या जागा आताच निश्चित करा अशी मागणीही आठवलेंनी केलीय. रिपाईं सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबवणार असून सर्व जातीच्या आघाड्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं आठवलेंनी सांगितलं.

First Published: Tuesday, July 3, 2012, 21:52


comments powered by Disqus