न्यायालयाच्या परिसरातच साक्षीदारांवर हल्ला - Marathi News 24taas.com

न्यायालयाच्या परिसरातच साक्षीदारांवर हल्ला

www.24taas.com, नागपूर
 
गुरुवारी सकाळी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतच 25 ते 30 जणांच्या जमावानं चार साक्षीदारांवर हल्ला झालाय. या साक्षीदारांना जमावानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा प्रकार घडला.
 
2009 मध्ये नागपुरात झालेल्या एका खूनप्रकरणात चौघे जण साक्षीदार होते. याच खटल्याप्रकरणी साक्ष देण्यासाठी हे चौघे जण न्यायालयात उपस्थित झाले होते. यावेळी एका विशिष्ट जमावानं त्यांना मारहाण केली. हे हल्लेकरूही सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले होते. न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साक्षीदारांना गाठून या जमावानं त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन साक्षीदारांना सोडवलं. या प्रकरणी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेतलयं.
 
दरम्यान, कोर्टाची सुरक्षा वाढवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागपुरातल्या बार असोसिएशननं दिलाय. या हल्ल्याच्या निमित्तानं नागपूर कोर्टाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एका आठवड्याच्या आत सुरक्षा वाढवा, अशी मागणी जिल्हा बार संघटनेचे अध्यक्ष सुजित जैस्वाल यांनी केलीय.
 
 

First Published: Thursday, July 5, 2012, 17:16


comments powered by Disqus