Last Updated: Monday, July 9, 2012, 10:04
www.24taas.com, चंद्रपूर चंद्रपूर शहरातील उच्चभ्रू वस्तीत चालणा-या २ कुंटणखान्यांवर धाड घालून पोलिसांनी तब्बल २५ मुलीना ताब्यात घेतलंय. औद्योगिकरणाच्या वाढीमुळं चंद्रपूर शहरात वेश्या व्यवसाय फोफावत चाललाय.
गौतमनगर आणि गंजबाजार या दोन ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून महिला दलाल आणि त्यांच्या टोळीत वेश्या व्यवसाय करणा-या एकूण २५ मुलींना ताब्यात घेतले आहे. नागपूर, गोंदिया आणि आंध्रप्रदेशातून मुलींना चंद्रपुरात आणले जात असल्याची माहिती धाडीदरम्यान मिळाली आहे.
नवे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई सुरु केली आहे.
First Published: Monday, July 9, 2012, 10:04