Last Updated: Thursday, July 12, 2012, 18:40
www.24taas.com, गोंदिया गोंदियातल्या स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झालाय. रात्री झोपेत असताना पाच जणांना सर्पदंश झाला. त्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर तिघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तोमेश ठाक आणि भोजराज मरई अशी मरण पावलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. तर गंभीर तीन विद्यार्थ्यांवर गोंदियातल्या बजाज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या डावरी तालुक्यात मकारधाकडा या गावात स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रम शाळा असून या शाळेत 200 ते 300 मुले राहून शिक्षण घेतात.
आज पहाटे 4 च्या सुमारास ही मुलं झोपलेली असतांना पाच मुलांना सर्पदंश केला. सुरूवातीला त्यांना नेमका कशामुळे त्रास होतोय हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. सातच्या सुमारास हा सर्पदंशाचा प्रकार लक्षात येताच त्यांना तत्काळ रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच दोन मुलांचा मृत्यू झाला तर इतर तीन मुलांपैकी दोघांना आयसीयूत ठेवण्यात आलय. सर्पदंश होऊन विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या या घटनेनं आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
First Published: Thursday, July 12, 2012, 18:40