सावकार स्त्रीची हत्या, मृतदेहाचे तुकडे घरातच पुरले - Marathi News 24taas.com

सावकार स्त्रीची हत्या, मृतदेहाचे तुकडे घरातच पुरले

www.24taas.com, बुलढाणा
 
बुलढाणा जिल्ह्यात चिखली शहरात सावकारीचा धंदा करणा-या एका बाईला मारल्याची आणि कुणाला कळु नये म्हणुन तिच्या देहाचे तुकडे करुन स्वतःच्याच घरात पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
 
भीमज्योतीनगर भागात नंदा गवई हा सावकारीचा धंदा करत होती. याच स्त्रीची हत्या करण्यात आली. याच गावातल्या विमल जाधवने तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. विमलनं नंदा बाईकडून तीन वर्षाआधी व्याजाने पैसे घेतले होते. नंदा बाई तिच्याकडे पैसे मागण्यासाठी गेली असता त्या दोघींमध्ये भांडण झालं आणि विमल बाईने नंदाबाईच्या डोक्यात लोखंडी सब्ल मारल्याने तिचा मृत्यू झाला.
 
विमल बाईने पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृत देहाचे तुकडे करून घरातच पुरून टाकल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. विमल बाईच्या घराची तपासणी करण्यासाठी चिखली पोलीस न्यायालयात गेले असून न्यायालयाकडून परवानगी मिळून तपासणी झाल्यावरच सत्य बाहेर येईल.

First Published: Monday, July 16, 2012, 16:41


comments powered by Disqus