गुप्तधनासाठी डॉक्टरची सापांची तस्करी - Marathi News 24taas.com

गुप्तधनासाठी डॉक्टरची सापांची तस्करी

झी २४ तास वेब टीम, चंद्रपूर
 
चंद्रपूरच्या दूर्गापूर भागात सापाची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही तस्करी एक DHMSची पजवी असलेला डॉक्टर करत होता. वनविभागाने टाकलेल्या धाडीत त्याच्याकडून ४ मालवणी जातीचे साप जप्त करण्यात आले.
 
डॉ.गेडाम यांच्या दूर्गापूर भागातल्या शांती क्लिनिकमधून पोलीस आणि वनविभागाने या सापांना ताब्यात घेतलं. डॉक्टर गेडाम हा DHMS असुन आपलं क्लिनीक चालवण्यासोबतच साप पाळणे त्यांची तस्करी करणे, सापाच्या वापराने रोगांवर कथित उपचार करण्याचे उद्योग करत होता. इतकचं काय तर सेक्स पावर वाढवण्यासाठी आणि गुप्तधनाच्या शोधासाठीही तो साप वापरायचा अशीही धक्कादायक माहिती पुढे आली.
 
दरम्यान वनविभाग वन्यजीव अधिनियमाअंतर्गत या डॉक्टरवर कारवाई करणार आहे. आणि पोलीस या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. सापांचा उपयोग करण्याच्या नावाखाली या डॉक्टरने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलं. तसचं त्याचं पॅथॉलॉजी सेंटरही विनापरवाना असल्याचं समजतं. पोलीस या प्रकरणाच्या तळाशी जात असुन अजुन गेडाम कशात गुंतला आहे का याचा ते शोध घेत आहेत.

First Published: Thursday, December 15, 2011, 06:31


comments powered by Disqus