भाजपाच्या आणखी दोन आमदारांचे निलंबन - Marathi News 24taas.com

भाजपाच्या आणखी दोन आमदारांचे निलंबन


झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
विधान भवनात धान जाळल्याप्रकरणी आणखी दोन भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. विधान परिषदेचे आमदार पाशा पटेल आणि केशव मानकर यांना उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्य़ात आले आहेत. भाजपचे आणखी दोन आमदार निलंबित केले गेले आहेत.
 
विधान भवनाच्या आवारात धान जाळल्या प्रकरणी कारवाई पाशा पटेल, किसनराव मानकरांचे निलंबन करण्यात आले आहे. आमदारकीच्या उर्वरित कालावधीसाठी हे  निलंबन असणार आहे. पटेल, मानकर यांनी विधान परिषद भवनाच्या आवारात धान जाळले होते. कापूस आणि अन्य शेतमालाला योग्य किंमत मिळेपर्यंत कामकाज चालू न देण्याच्या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत. विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी भाजपचे आमदार नाना पटोलेंचे निलंबन रद्द करण्याची मागणी आणि हमीभावाच्या मुद्यावर गोंधळ घातला.
 
त्यामुळं तासाभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. तर विधान परिषदेतही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेऊन दिवसभराठी कामकाजावर बहिष्कार घातला. काल मुख्यमंत्र्यांनी कापसाच्या मुद्यावर दिलेल्या उत्तरानंतर विरोधकांना बोलण्याची संधी दिली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसंच राईट टू रिप्लायचा भंग केल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

First Published: Thursday, December 15, 2011, 09:34


comments powered by Disqus