Last Updated: Thursday, July 19, 2012, 18:22
www.24taas.com, चंद्रपूर चंद्रपूर-गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचा अनोखा प्रताप पुढं आलाय. विद्यापीठाच्या एफवायबीएच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात १४वे राष्ट्रपती म्हणून चक्क प्रणव मुखर्जींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय.
आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान होत असून २२ जुलैला मतमोजणी आहे. मात्र या पुस्तकाचे संपादन करणा-या डॉक्टर संजय गोरे यांनी निवडणुकीपूर्वीच प्रणवदांच्या गळ्यात राष्ट्रपतीपदाची माळ घातलीय. महिन्याभरापूर्वीच एफवायबीएच्या पुस्तकांची छपाई करण्यात आलीय. त्यामुळं विद्यापीठानं महिन्याभराआधीच भारताच्या १४ व्या राष्ट्रपतींची निवड करून टाकली.
या विद्यापीठाची स्थापना वर्षभरापूर्वीच झाली असून या विद्यापीठाच्या इमातरतीपासून अभ्यासक्रमापर्यंत सर्वकाही नवीन आहे. सारे काही नवे असल्यानं कुलगुरू डॉक्टर विजय आईंचवार यांनी स्वत: लक्ष घातलंय. मात्र तरीही अशा प्रकारची अक्षम्य चूक पदवीच्या अभ्रासक्रमात करण्यात आलीय. याप्रकरणी पुस्तकावर बंदी घालून पुस्तकारच्या संपादकावर कारवाई करण्याची मागणी केलीय.
First Published: Thursday, July 19, 2012, 18:22