Last Updated: Thursday, December 15, 2011, 16:34
झी २४ तास वेब टीम, नागपूर नगरपालिका निवडणुकीत अण्णा फॅक्टर चालला नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलं होतं. आता काँग्रेसवर कुरघोडी करत राष्ट्रवादीनंही अण्णांना लक्ष केलंय.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवन परिसरात मतदारांनी अण्णांच्या श्रीमुखात भडकावली. अशा आशयाचे पोस्टर घेऊन आले होते. शरद पवारांवरील हल्ल्याप्रकरणी अण्णांनी केलेलं वक्तव्य आणि नगरपालिका निवडणुकीत मिळालेलं यश पाहता जनतेनं हाताने नव्हे तर मताच्या रुपानं अण्णांना धडा शिकवल्याचं आव्हाडांनी सांगितलं.
शरद पवार यांच्यावरील हल्ल्यानंतर ' सिर्फ एकही थप्पड मारा ?' असे उद्गार अण्णा हजारे यांनी काढले होते. आपल्या ब्लॉगमध्येही यानंतर शरद पवारांवरील हल्ल्याचे अण्णांनी समर्थन केले होते.
First Published: Thursday, December 15, 2011, 16:34