नक्षलवाद्यांनी केली तरूणाची हत्या - Marathi News 24taas.com

नक्षलवाद्यांनी केली तरूणाची हत्या

झी २४ तास वेब टीम, गडचिरोली
 
 
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तहसिलच्या भेंडीकणार या गावात एका २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. पहाटे झोपेतून उठवून,गावाबाहेर नेऊन त्याच्या डोक्यावर बार करुन त्याला ठार करण्यात आलं.
 
 
जिल्ह्यात सध्या पोलीस भरती सुरू आहे. रोजगाराअभावी तरुण-तरुणी पोलीसभरती करता अर्ज करतायत. तसाच अर्ज या २१वर्षीय बाजीराव कोवाची याने केला होता. पण युवकांच्या पोलीस भरतीला विरोध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे निर्घृण कृत्य केलं.
 
नक्षलवादी त्याच्या घरी येऊन त्याला घेऊन गेले आणि सकाळी सोडून देऊ असं त्याच्या वडिलांना सांगितलं पण मिळाला तो त्याचा मृतदेह. जिल्हयात अशी भयंकर घटना घडल्यानं रहिवासी भयभीत झालेत.
 
दरम्यान,  गोटेझरी गावात पोलिसांनी कारवाई करून चार नक्षलवाद्यांना शुक्रवारी अटक केली. चारही नक्षलवादी शस्त्रधारी आहेत. नक्षलविरोधी पथकाने पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरवातीला नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. त्यानंतर पोलिसांना चार नक्षलवाद्यांना शस्त्रासह अटक केली.
 
 

First Published: Wednesday, December 21, 2011, 06:51


comments powered by Disqus