Last Updated: Sunday, December 25, 2011, 21:13

झी २४ तास वेब टीम, नागपूर
नागपूरमधल्या वाडी इथं वीजेच्या अतिउच्च दाबाच्या टॉवरवर चढून एका तरुणानं वीरुगिरी करत सगळ्यांनाच जेरीस आणलं. पत्नीशी भांडण झाल्यामुळे हा तरुण दारूच्या नशेत टॉवरवर चढला होता.
विजेच्या तारेला लटकून तो स्टंटबाजी करत होता. विजेचा प्रवाह बंद असल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले. आपल्या मुलाला आपल्यापर्यंत आणा नाहीतर आपण आत्महत्या करू अशी धमकी या तरुणानं दिली होती.
मुलाला आणल्यानंतरच या तरुणाची वीरुगिरी थांबली. या तरुणाची वीरुगिरी पाहण्यासाठी लोकांनीही मोठी गर्दी केली होती.
First Published: Sunday, December 25, 2011, 21:13