'स्टार बस'चा रखडलेला मुद्दा - Marathi News 24taas.com

'स्टार बस'चा रखडलेला मुद्दा

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
नागपूरच्या स्टार बसचा मुद्दा महापालिका निवडणूकीत पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत. मात्र समस्येकडं लक्ष देण्याऐवजी राजकीय पक्ष निवव्ळ आरोप प्रत्यारोप करत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.
 
गेली चार वर्षे सतत वादात सापडलेला नागपूरचा स्टार बस सेवेचा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गाजण्याची चिन्हे आहेत. बसची स्थिती, वाहतुक व्यवस्था हे प्रश्न बाजूला राहून निव्वळ राजकारण केलं जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
 
राजकीय पक्षांनी बस सेवा सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील याचा विचार करण्यापेक्षा आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्यता मानलीय. शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात मार्ग काढायचा सोडून निव्वळ राजकीय फायद्या-तोट्याचा विचार सुरु आहे. त्यामुळं मुलभूत प्रश्नांकडं दुर्लक्ष होतंय.
 

 
 

First Published: Thursday, December 29, 2011, 09:33


comments powered by Disqus