नागपूर : तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News 24taas.com

नागपूर : तलावात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

24taas.com, नागपूर
 
नागपूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. अभियांत्रिकी कॉलजेच्या तीन विद्यार्थ्यांना पोहताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 
नविन वर्षाचं सेलिब्रेशन करायला गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. नागपूरमधल्या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिलपी तलावात ही दुर्दैवी घटना घडली. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३० ते ४० विद्यार्थी-विद्यार्थिनी न्यू इयर  सेलिब्रेशनसाठी या तलावाजवळ आले होते. यावेळी जोशात येऊन हे विद्यार्थी खोल पाण्यात पोहोण्यासाठी उतरले तेव्हा ही दुर्घटना घडली.
 
अभिषेक कापडी, धीरेन भट्ट आणि अनशुमन पाठक अशी या मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातीला ही दुर्घटना घडल्यानं त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

First Published: Tuesday, January 3, 2012, 12:34


comments powered by Disqus