चंद्रपूरात वैद्यकिय महाविद्यालय नाहीच - Marathi News 24taas.com

चंद्रपूरात वैद्यकिय महाविद्यालय नाहीच

www.24taas.com, चंद्रपूर
 
चंद्रपूरमध्ये वैद्यकिय महाविद्यालय व्हावं ही अनेक दिवसांपासूनची मागणी आहे, तशी सरकारकडून आश्वासनसुद्धा अनेकवेळा दिली गेली, पण ती फक्त आश्वासनचं राहिली आहेत. यावर्षी ही मागणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती, मात्र सरकारने पुन्हा एकदा चंद्रपूरवासियांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.
 
 
चंद्रपूर शहराला याही वेळेस मेडिकल कॉलेज मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात नुकतीच ४ वैद्यकीय महाविद्यालयं स्थापण्याची घोषणा केली पण त्यात चंद्रपूरचं नाव नाही. राज्यातील अन्य शहरांना महाविद्यालयं मिळाली पण १० वर्षापासून चंद्रपुरातल्या प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीची काही चिन्ह नाहीत.
 
 
विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी चंद्रपुराला मेडिकल कॉलेज देण्याचं आश्वासन दिलं होतं पण काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानं अत्तापर्यंत फक्त आश्वासनच दिली. खरतर चंद्रपुर हे लोह,कोळसा,सिमेंट,उर्जा अशा सगळ्याच उद्योगांचा जिल्हा आहे. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावतो आहे तसचं शेजारी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा त्यामुळे चंद्रपुरातल्या नागरिकांना वेद्यकीय महाविद्यालयाची प्रतिक्षा होती.
 

First Published: Friday, January 6, 2012, 09:27


comments powered by Disqus