कटतीला केळी शेतक-यांचा विरोध - Marathi News 24taas.com

कटतीला केळी शेतक-यांचा विरोध

 
झी २४ तास वेब टीम, जळगाव
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यानं जळगांव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतक-यांवर चांगलाच प्रभाव टाकलाय. रावेर तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून प्रती क्विंटलला 3 किलो कटतीला शेतक-यांनी उघड विरोध केला होता. यापुढे असा भ्रष्टाचार चालू देणार नसल्याचा निर्णय शेतक-यांनी घेतलाय.
 

जळगाव जिल्ह्यात व्यापारी क्विंटलला 3 किलो केळीची कटती करुन शेतक-यांची कोट्यवधीं रुपयांची लूट करतांना दिसून येतात. मात्र आता फ्क्त रावेर तालुक्यातील शेतकरी कटती मुक्त झालाय. कटती विरोधात शेतक-यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली मात्र सरकारनं याविरोधात काहीच भूमिका घेतली नाही त्यामुळे रावेर तालुक्यातील शेतक-यांनी एकत्र येउन कटती बंद केरुन व्यापा-यांना चांगलाच दणका दिला. तसेच व्यापा-यांनी इलेक्ट्रोनिक काट्यांचा वापर करावा आणि बाजार समितीतील काट्यांसाठी निम्म भाड आकारण्यात यावा असा ठरावही शेतकरी आणि व्यापा-यांच्या बैठकीत पास करण्यात आला.
 
रावेर तालुक्यातील शेतकरी कटती बंद करुन थांबला नाही तर त्यांनी केळीचे दर बाजार समितीच ठरावणार असा नवा नियमही लागू केलाय. यासाठी तीन व्यापारी आणि तीन शेतक-यांना घेउन नव्या समितीचंही गठन झालंय. मात्र आता व्यापारी या विषयी फक्त चर्चा झाली असल्याचं सांगतायत. तर शेतक-यांनी या विषयी थेट अण्णांकडून मदत घेणार असल्याचं स्पष्ट केलंय.
 
देशात व्यापा-यांनी आजवर शेतक-यांना लुटण्याचाच काम केलंय मात्र आता त्यांची मुजोरी वाढलीय. शेतक-यांनी या षंढ प्रशासनाकडून कुठलीही अपेक्षा न करता थेट व्याप्यांची वृत्तीच आता ठेचून काढायला हवी, अशी प्रतिक्रीया उमटत आहे.

First Published: Sunday, October 16, 2011, 06:42


comments powered by Disqus