नागपूरमध्ये बहिणींचं रॅगिंग - Marathi News 24taas.com

नागपूरमध्ये बहिणींचं रॅगिंग


www.24taas.com, नागपूर
 
नागपूरच्या मुक्ताबाई लेडीज होस्टेलमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींनी दोन बहिणींचं रॅगिंग केलं आहे.
 
होस्टेलच्या वॉर्डननं या प्रकाराकडं दुर्लक्ष केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली  आहे. याप्रकरणी होस्टेल प्रशासनानं स्मिता कांबळे, संगिता बनकर आणि नम्रपाली गोंडाणे या तीन मुलींना होस्टेलमधून निलंबित केलं आहे. मात्र त्यामुळं हे प्रकरण शमण्याऐवजी अधिकच भडकलं आहे. निलंबित विद्यार्थिनींसह इतर विद्यार्थिनींनी समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन  पुकारलं आहे.
 
आपल्याविरुद्ध रॅगिंगचा खोटा आरोप केल्याचं  त्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी आपल्याला तक्रार मिळाली असली, तरी नियमानुसार समाज कल्याण विभागाचा  अहवाल आल्याशिवाय गुन्हा नोंदवणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
 

First Published: Thursday, January 12, 2012, 16:53


comments powered by Disqus