Last Updated: Saturday, January 14, 2012, 22:23
www.24taas.com, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीसांना यश आलं आहे.
बेजुरपल्ली जंगलात नक्षल शोध मोहिमेदरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक उडाली. दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युरादाखल पोलीसांनी केलेल्या केलेल्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार झाले. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत एटापल्ली तालुक्यातल्या कोसमीच्या जंगलात उडालेल्या चकमकीत सहापेक्षा अधिक नक्षलवादी गंभीर जखमी झाल्याचा दावा स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. या ठिकाणीसुद्धा पोलीसांनी नऊ भरमार बंदुका आणि १६ पिट्टू जप्त केलेत. यानंतरही या दोन्ही जंगल परिसरात नक्षल शोधमोहिम सुरु राहणार आहे.
First Published: Saturday, January 14, 2012, 22:23