Last Updated: Sunday, January 15, 2012, 12:29
www.24taas.com, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसने दलित मतांची बेगमी करण्यासाठी व्युहरचना आखत भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरु केली आहेत. मुंबई महापालिका निवडणुका शिवसेना, भाजप आणि रामदास आठवलेंच्या रिपाइ महायुती एकत्रित लढणार आहे. रामदास आठवलेंच्या या निर्णयावर प्रकाश आंबेडकर नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांशी राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चा केली.
प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाची ताकद विशेत्वाने विदर्भात आहे आणि अकोला जिल्हा परिषदेवर गेली काही वर्षे त्यांचे सदस्य सातत्याने निवडून येतात. अकोला जिल्हा परिषदेत अनेकवेळा प्रकाश आंबेडकरांनी निर्णायक भूमिका बजावली तसंच त्यांच्या पक्षाचा उमेदवाराने अध्यक्षपदही भूषवलं आहे. अकोला जिल्ह्यातून भारिप बहुजन महासंघाचे आमदारही विधानसभेवर निवडून गेले आहेत.
First Published: Sunday, January 15, 2012, 12:29