चंद्रपुरातील नगरसेवकाच्या बोगस प्रमाणपत्राची कहाणी - Marathi News 24taas.com

चंद्रपुरातील नगरसेवकाच्या बोगस प्रमाणपत्राची कहाणी

www.24taas.com, मुंबई 
 
 चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिकेचा विद्यमान नगरसेवक नासीर खान यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वत:ची जात बदलून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करत निवडणूक लढवल्यानं राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. या नगरसेवकानं OBC राखीव असलेल्या प्रवर्गातून विजय मिळवला होता. एव्हढच नाही तर शाळेची सर्टिफिकेट्स देखील बोगस बनवली
 
बल्लारपूर नगरपरिषदेच्या झाकीर हुसेन वॉर्डातल्या ओबीसी प्रवर्गातून नासीर खान या काँग्रेसच्या उमेदवारानं विजय मिळवला. मात्र खान यांना हा विजय पचनी पडेल असं दिसत नाहीये. कारण त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेली माहिती आणि कागदपत्रं बोगस असल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं.  इतकचं नाही तर या महाशयांनी स्वत:ची जन्मतारीखही वेगवेगळी दाखवली आहे. मात्र आता नासीर खान यांच प्रकऱण उघड झाल्यानंतर राजकीय वादळ उठलं आहे.
 
मेघा भाले यांनी हे प्रकऱण कागदपत्रांसहित उघड केल्यानंतर बल्लारपूरच्या पोलीस ठाण्यात नगरसेवक नसीर खान यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मात्र घोटाळेबाज नगरसेवक नासीर खान सध्या फरार आहे.. पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत.
 
ज्या नगरसेवकाच्या एका सहीच्या आधारे कित्येक कागदपत्र साक्षांकित केली जातात. त्याच नगरसेवकानं असं कृत्य केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
 
 

First Published: Sunday, January 15, 2012, 16:17


comments powered by Disqus